Hasan Mushrif : आधी नवाब मलिक आता मी आणि नंतर अस्लम शेख; सोमय्यांनी नक्की काय ठरवलंय? : हसन मुश्रीफ
ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ यांनी, सविस्तर माहिती घेऊन या प्रकरणावर मी बोलणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच दीड दोन वर्षात जी कारवाई झाली त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं.
कोल्हापूर : भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीविरोधात मोर्चाच उघडला आहे. याच्या आधी त्यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले ते आज एकतर तुरूंगात आहेत. नाहीतर भाजपमध्ये. आताही किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. यावरून मुश्रीफ यांनी भाजपसह सोमय्यांवर आरोप केले आहेत.
या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ यांनी, सविस्तर माहिती घेऊन या प्रकरणावर मी बोलणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच दीड दोन वर्षात जी कारवाई झाली त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं. कोणत्या हेतूने छापा मारला हे माहीत नाही. मी सर्व माहिती घेतल्यानंतर प्रसार माध्यमांसमोर खुलासा करीलच. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
तर याच्या आधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली. आता माझ्यावर. नंतर अस्लम शेख यांच्यावर कारवाई करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणत आहेत. त्यामुळे विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट करण्याचं सोमय्या यांनी ठरवलंय की काय अशी शंका येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.