VIDEO : ‘आक्षेपार्ह स्टेटसवरून हसन मुश्रीफ याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘…हे कोल्हापूर पोलीसाचं’

| Updated on: Jun 12, 2023 | 12:15 PM

कागल शहरात टिपू सुलतानच्या व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून वाद समोर आला आहे. येथे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांच्याकडून कागल बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र पोलीसांची विनंती मुळे आणि आठवड्या बाजारामुळे ही हाक मागे घेण्यात आली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर येथील आक्षेपार्ह स्टेटसवर आठवडाभरापुर्वीच दंगली सारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर येथील कागल शहरात टिपू सुलतानच्या व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून वाद समोर आला आहे. येथे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांच्याकडून कागल बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र पोलीसांची विनंती मुळे आणि आठवड्या बाजारामुळे ही हाक मागे घेण्यात आली आहे. तर आता कागलमधील जनजीवन पुर्व पदावर आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना, औरंगजेब हा मुस्लिमांचा कधीच होऊ शकत नाही. तर शिवरायांना मुस्लिमांबद्दल कधीच आकस नव्हता असे म्हटलं आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरातील वातावरण बिघडत असल्याचे सांगत हे कोल्हापूर पोलिसांचे फेल्युर असल्याची टीका केली आहे. त्याचबरोबर पोलीसांनी या प्रकरणी त्या तरूणाला ताब्यात घेतलं आहे. पण तात्काळ कारवाई करायला हवी. तर जसजशा निवडणूका जवळ येतील तसे वातावरण बिघडतं असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 12, 2023 12:15 PM