Hasan Mushrif | ‘मला पाडणारा अजून जन्माला यायचाय’, हसन मुश्रीफांनी ललकारले

| Updated on: Aug 08, 2022 | 4:22 PM

Hasan Mushrif | मला पाडणारा अजून जन्माला यायचाय असे आव्हान हसन मुश्रीफांनी समरजीतसिंहांना दिले.

Hasan Mushrif | मला पाडणार अजून जन्माला यायाचाय असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते  हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSinh Ghatge) यांना दिले. आपण आता वयाच्या सत्तरीत पोहचलो आहोत. यापूर्वी आपण सलग विधानसभेत सहा वेळा जोरकसपणे जिंकून आलो आहोत. तरीही समरजीतसिंह हे हसन मुश्रीफांच्या पराभवाची भाषा करत असतील तर हा माझा अपमान असल्याचे सांगत, त्यांनी आपल्याला ते हरवू शकत नसल्याचे सांगत घटगे यांना ललकारले आहे. आपण 200 कोटींची कामे मंजूर करुन आणली, पण घाटगे हा निधी मिळू नये, विकास कामांना (Development Work) खिळ बसावी यासाठी मुंबईला हेलपाटे मारत असल्याचा आरोप ही त्यांनी केला. घाटगे यांनी आपला ऐकेरी उल्लेख केल्याचा आरोप ही त्यांनी केला. घाटगे यांचं वय लहान आहे. निवडणुकांना अजून दोन अडीच वर्षांचा कालावधी बाकी आहे. लोकशाहीत निवडणुकीला कोणीही उभं राहू शकतं. आपल्याला नाहक वाद घालायचा नसल्याचे म्हणणे ही त्यांनी मांडले.

Sanjay Raut ED: संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!
Mahadev Jankar On Cabinet Expansion | रासपला ही हवा सत्तेत वाटा , महादेव जानकरांचा एका जागेवर दावा