“शरद पवार आमचे दैवत, भविष्यातही एकत्र राहणार”, अजित पवार गटाच्या नेत्याच सूचक विधान

| Updated on: Aug 02, 2023 | 8:21 AM

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी बंडखोरी केली. या बंडानंतर हसन मुश्रीफ यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात मोठं विधान केलं आहे.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यानिमित्ताने काल त्यांनी जे.जे. रुग्णालयातील शल्यचिकित्साशास्त्र विभाग व कक्षाच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पवार साहेब हे दैवत आहेत. आम्ही एक कुटुंब आहोत. भविष्यातही आम्ही एकत्र राहणार अशी आशा आहे. हसन मुश्रीफ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: Aug 02, 2023 08:21 AM
संभाजी भिडे यांच्याविरोधात अजित पवार गट देखील रस्त्यावर, आंदोलनकरून केली अटकेची मागणी
शिवसेना-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही फुटणार? केसीआर राव यांच्या विधानाने चर्चांना उधाण