‘मंत्रीपद दिली नाही म्हणून तुम्ही त्याची किंमत देताय का?’ राऊत यांचा असा सवाल
त्यानंतर आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये देखील निधी वाटपाचा घोळ सुरूच आहे. विशेष म्हणजे आता देखील अजित पवार हेच अर्थ मंत्री आहेत. तर आता त्यांच्याकडून अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटातील आमदारांवर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे.
मुंबई, 24 जुलै 2023 | महाविकास आघाडीच्या सरकारवेळी अजित पवार यांच्यावरून रणकंदन झालं होत. तर निधी वाटपाच्या कारणावरून सरकारच कोसळलं होतं. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये देखील निधी वाटपाचा घोळ सुरूच आहे. विशेष म्हणजे आता देखील अजित पवार हेच अर्थ मंत्री आहेत. तर आता त्यांच्याकडून अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटातील आमदारांवर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे. मात्र शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटातील आमदारांच्या पदरी निराशा आली आहे. तर शिंदे गटाचे नाराज नेते भरत गोगावले यांना 150 कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यावरून आता पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी, सध्या निधी वाटपाचा जो प्रकार समोर आला आहे, तो पैशांचा अपहार आहे. भरत गोगावले यांना 150 कोटींचा निधी दिला हे ऐकनच मोठा धक्का असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर कुणाला तरी शांत करण्यासाठी एवढा निधी दिला जातोय. निधी वाटप एक संशोधनाचा विषय झाला असून मंत्रीपद दिली नाही म्हणून तुम्ही त्याची किंमत देताय का? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केलाय.