राज ठाकरे यांनी कौतुक केलेला मनसेचा ‘हा’ शीख शिलेदार आहे तरी कोण?

| Updated on: Oct 12, 2023 | 3:12 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेत पक्षाची वाटचाल सुरु केली. त्यांच्या या लढ्याला साथ देण्यासाठी अनेक मराठी तरुण एकवटले. मात्र, एका शीख तरुणही त्यांना साठ देत आहे. जिथे आपण राहतो तिथली अस्मिता आपण जपली पाहिजे. ज्या वातावरणात वाढतो तीच आपली संस्कृती असे हा तरुण म्हणतो.

रत्नागिरी : 10 ऑक्टोबर 2023 | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतला. मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे यांनी अनेक आंदोलनं केली. त्यांच्या या मराठी अस्मितेच्या मुद्द्याला पाठींबा देण्यासाठी मराठीप्रमाणेच शीख तरुणही पुढे येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातून उल्लेख झालेले नवजोतसिंग गौड हे पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर आलेत. विशेष म्हणजे नवजोतसिंग गौड हे कोकणातील मंडणगडचे तालुकाप्रमुख आहेत. नवजोतसिंग गौड हे शिख असले तरी शुद्ध आणि स्पष्ट मराठीत बोलतात. गौड यांना मराठी अस्मितेचा अभिमान असल्याचं आवर्जुन सांगतात. शिख असून मराठी बोलताना काहीच अडचण जाणवत नाही असं ते नम्रतेने सांगतात. मनसेचा कार्यकर्ता ते मंडणगडच्या मनसेच्या तालुका प्रमुख हा त्यांचा प्रवासही तेवढाच रंजक आहे.

Published on: Oct 10, 2023 08:05 PM
पवार गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, महिलांना डावललं जातंय, कुणी केला आरोप?
रामदास आठवले यांना हवंय राज्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद, इंडिया आघाडीलाही लगावला टोला