शाळेत स्नेह संमेलनासाठी गेला, पण पोहोचला पोलिसांच्या वर्गात, मग त्यांनी असा धडा शिकविला की…
एका खाजगी शाळेच्या स्नेहसंमेलनात मोठ्या जोशात भाषण करायला निवासी उपजिल्हाधिकारी उभे राहिले. पण, त्यांच्या भाषणाची लकब पाहून तिथे उपस्थित पोलिसांना संशय आला
हिंगोली : एका खाजगी शाळेच्या स्नेहसंमेलनात मोठ्या जोशात भाषण करायला निवासी उपजिल्हाधिकारी उभे राहिले. पण, त्यांच्या भाषणाची लकब पाहून तिथे उपस्थित पोलिसांना संशय आला आणि त्या निवासी उपजिल्हाधिकारी याची रवानगी थेट जेलमध्येच झाली. ही घटना हिंगोलीच्या एका शाळेत घडलीय. अमोल पजई हा आपण निवासाची उपजिल्हाधिकारी आहोत असे सांगत होता. एका खाजगी शाळेच्या स्नेह संमेलनात तो उपस्थित राहिला. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे हि उपस्थित होते. त्यांना या अधिकाऱ्याचा संशय आल्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी तो तोतया अधिकारी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. श्रीधर यांनी त्याला ताब्यात घेत अधिक चौकशी केली. अमोल पजई यांचं आणखी दोन सहकाऱ्यांनाही पोलिसानी ताब्यात घेतले आहे.
Published on: Feb 17, 2023 10:51 AM