4 Minutes 24 Headlines | जुन्या पेन्शनवरून राज्यांमध्ये 18 लाख कर्मचारी संपावर

| Updated on: Mar 14, 2023 | 7:53 AM

जुन्या पेन्शनवरून राज्यांमध्ये 18 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे शासकीय कामकाजाचा बोजारा उडण्याची शक्यता आहे

मुंबई : राज्यात शेतकरी, नोकरदार आणि सर्वसामान्य महागाईमुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे नोकरदार जुन्या पेन्शनसाठी तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जुन्या पेन्शनवरून राज्यांमध्ये 18 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे शासकीय कामकाजाचा बोजारा उडण्याची शक्यता आहे. तर याच संपात रुग्णालयातील कर्मचारीही सहभागी होणार असल्याने याचा थेट परिणाम रूग्णसेवेवर होईल. यादरम्यान सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी संपात सामिल व्हाल तर कारवाई होईल असा इशारा दिला आहे. तर आज भोसरी कठीण जमीन घोटाळा प्रकरणी आज मुंबई हायकोर्टामध्ये एकनाथ खडसे जाणार आहेत. राज्यातील विधीमंडळ चोर असे म्हटल्याने उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रस्तावावर आज 11 चर्चा होणार, आज हक्कभंग समितीची बैठक.

Video : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी 18 लाख कर्मचारी संपावर
शेतकरी-आदिवासींच्या लॉंगमार्चचा तिसरा दिवस; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, तोडगा न निघाल्यास भूमिका काय?