4 Minutes 24 Headlines | आदानींच्या चौकशीची गरज नाही : शरद पवार
हिंडेनबर्ग अहवालावरून अदानींना लक्ष करण्यात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणामध्ये संयुक्त संसदीय समितीकडून आदानींच्या चौकशीची गरज नसल्याचे म्हटलं आहे. तर याप्रकरणातून त्यांना लक्ष करण्यात आल्याचंही मत पवार यांनी मांडलं आहे
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांनी दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. त्यांनी हे कार्यक्रम काही खाजगी कारणास्तव रद्द केले असून ते काल आणि आज कार्यक्रम होते. त्यांचे हे कार्यक्रम रद्द झाल्याने सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर हिंडेनबर्ग अहवालावरून अदानींना लक्ष करण्यात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणामध्ये संयुक्त संसदीय समितीकडून आदानींच्या चौकशीची गरज नसल्याचे म्हटलं आहे. तर याप्रकरणातून त्यांना लक्ष करण्यात आल्याचंही मत पवार यांनी मांडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पासून दोन दिवसीय आयोध्या दौऱ्यावर जात आहेत. ते त्यांच्या आमदार, खासदारांसह अयोध्येत शक्ती प्रदर्शन करणार आहेत. यावेळी त्यांना भाजपची साथ मिळणार आहे. यासाठी गिरीष महाजन, अशिष शेलार आणि मोहीत कंबोज हे अयोध्येला जाणार आहेत. ईव्हीएम मशीनवरून सामनातून भाजपवर निशाना साधण्यात आला आहे. भाजपला विजय मिळवून देणारी राक्षसी ईव्हीएम मशीन बंद होऊ द्या. मग दीडशे जागा जिंकतानाही भाजपची दमछाक होईल असा घणाघात करण्यात आला आहे. यासह घ्या इतर बातम्यांचा आढावा… 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये