4 मिनिट 24 हेडलाईन्स | राऊत यांची शिंदे गटावर पुन्हा एकदा टीका, म्हणाले…
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनावणीवरून शिंदे गटावर पुन्हा एकदा टीका केली आहे
4 Minutes 24 Headlines | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होईल. ही सुनावणी बुधवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी दुपारपर्यंत शिवसेना तर त्यानंतर ठाकरे गट युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनावणीवरून शिंदे गटावर पुन्हा एकदा टीका केली आहे. राऊत यांनी, सर्वोच्च न्यायालयात आमच्या पक्षावर दरोडा टाकणाऱ्यांच्या विरोधामध्ये सुनावणी सुरू आहे. यावर आठवडाभरामध्ये निर्णय अपेक्षित असल्याचेही राऊत म्हणाले. त्याचबरोबर या सुनावणीच्या आधीच ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जोडपत्र सादर करण्यात आले आहे. ज्यात राज्यपालांकडून अधिकारांचा गैर वापर करण्यासह अपात्र आमदारांच्या मतदानासह इतर पाच विषयांवर जोडपत्रातून मुद्दे मांडण्यात आले आहेत. याबरोबरच इतर बातम्यांचाही घ्या आढावा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये…