4 Minutes 24 Headlines | आदित्य ठाकरे बालिश; त्या वक्तव्यावरून शिंदेंची प्रतिक्रिया
आदित्य ठाकरे यांच्या या गौप्यस्फोटानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देताना, शिंदे रडले नाही तर ठाकरेंनी मुख्यमंत्री पद वाचवण्याची याचना केल्याचे म्हटलं आहे
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरून गौप्यस्फोट केला. तसेच त्यांनी शिंदे हे मातोश्रीवर रडले असे म्हणाले, त्यावरून आदित्य ठाकरे हे बालिश असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या या गौप्यस्फोटानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देताना, शिंदे रडले नाही तर ठाकरेंनी मुख्यमंत्री पद वाचवण्याची याचना केल्याचे म्हटलं आहे. तर शरीर वाघाचा आणि काळीज उंदराचे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर आदित्य ठाकरे जे बोलत आहेत त्यात तथ्य असू शिंदे यांनी आपल्याकडेही जेलमध्ये जाण्याची भीती व्यक्त केल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर आदित्य ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेच्या दरम्यान ते आपल्या माहितीप्रमाणे खोटे बोलत नाहीत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी देशहितांसाठी एनसीपी भाजपासोबत येत असल्यास स्वागत असल्याचं म्हटलं आहे.