निकालानंतर ऋतुजा लटके काय म्हणाल्या? कोठे गेल्या या बातम्यांसह पहा इतर अपडेट 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

| Updated on: Oct 13, 2022 | 7:52 PM

निकालानंतर ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेतल्याचे ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आज न्यायालयाने दिलासा दिला आहे. तर बीएमसीला झटका देत उद्या सकाळी 11 पर्यंत त्यांचा राजीनामा स्विकारा असे आदेशच न्यायालयाने दिला आहे. तर या निकालानंतर ऋतुजा लटके यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेतल्याचे ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे. तर मी फक्त मशाल याच चिन्हावर लढेन अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे. तसेच उद्या राजीनामा हातात मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही लटके यांनी म्हटलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे आणि शिंदे गटात हमरी तुमरी लागली असतानाच या जागेसाठी 3 अर्ज दाखल झाले आहे. यापैकी 2 अपक्ष आणि एक क्रांतिकारी जैन हिंद सेनेकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

 

Published on: Oct 13, 2022 07:52 PM
उद्याची वाट न पाहता आजच लटकेंचा राजीनामा स्विकारावा, यासह पहा महाफास्ट न्यूज 100
पोटनिवडणूक आणि ठाकरे-शिंदे गटात घमासान. पहा नव्या अपडेट टॉप 9 न्यूजमध्ये