अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, यासह पहा इतर अपडेट 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

| Updated on: Oct 11, 2022 | 5:48 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मशालीवरूनटीकास्र सोडलं आहे. तसेच मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला मशालीच लावल्या. तर मशालींचा वापर हा घरांना उद्धवस्त करण्यासाठी नको असे ही ते म्हणाले.

आमची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसेच त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली असेही शिंदे म्हणाले. तर ही मशाल अन्याय आणि गद्दारीला जाळणारी आहे. असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सांताक्रुझ येथील शिवसैनिकांच्या भेटीवेळी केलं आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मशालीवरूनटीकास्र सोडलं आहे. तसेच मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला मशालीच लावल्या. तर मशालींचा वापर हा घरांना उद्धवस्त करण्यासाठी नको असे ही ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या मशालीला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने तळपता सुर्य या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर केला. तर हेच चिन्ह मिळावे म्हणून शिंदे गट आग्रही असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यादरम्यान अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तर ईडीकडून देशमुखांना आर्थिक गैर व्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्या कोठडीत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

 

पालघर साधू हत्या प्रकरण सीबीआयकडे जाणार, यासह इतर अपडेट पहा सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये
भाजपला दुसऱ्यांची घरं मोडण्यात आनंद मिळतो, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात यासह पहा बातम्या 25 महत्वाच्या बातम्या