4 Minutes 24 Headlines | माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही; पोस्टरमधून ठाकरेंना डिवचलं

| Updated on: Apr 02, 2023 | 9:27 AM

वज्रमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे, अजित पवारांसह नाना पटोले एकाच मंचावर असणार आहेत. तर यासभेसाठी छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

4 मिनिट 24 हेडलाईन्स | राज्याच्या राजकारणात आज छत्रपती संभाजीनगरची सभा चर्चेचा विषय ठरली आहे. मविआची ही पहिलीच सभा असून यात होणार कोण काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर वज्रमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे, अजित पवारांसह नाना पटोले एकाच मंचावर असणार आहेत. तर यासभेसाठी छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याचदरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनला डिवचण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पोस्टरबाजी करताना शिवसेनेकडून, माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असा हल्लाबोल करण्यात आला आहे. तर ठाकरे यांच्या सभेला बाहेरून लोक येणार असल्यामुळे काळजी घ्या असा सल्ला पोलीसांना देताना, परिस्थिती चिखल्यास आयोजक जबाबदार असतील असा इशारा संजय शिरसाठ यांनी दिला आहे. तर शिरसाट यांच्यासह भाजप नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी उत्तर देताना, सभेच्या मार्गात काटे टाकण्याचे काम सुरू असल्याचे म्हटलं आहे. यासह पहा इतर बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

Published on: Apr 02, 2023 09:27 AM
मविआच्या सभेवर तिसऱ्या डोळ्याची नजर, वज्रमुठ सभास्थळी पोलीस दक्ष
‘मोदी-अदानी’ ही नावे आता भ्रष्टाचाराची प्रतीके; सामनातून केंद्र सरकारवर निशाना