रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांत ‘या’ दवाखान्यांमधून होणार मोफत उपचार

| Updated on: Apr 29, 2023 | 10:36 AM

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोग शाळा तपासणी, टेलीकन्सलटेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत.

अलिबाग : नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा (Health facilities) उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने हिंदुहृदयसम्राट “बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना (Hindu heart emperor Balasaheb Thackeray apala dawakhana scheme) सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये आपला दवाखाना योजना सुरू केली जात आहे. ही योजना महाराष्ट्र दिनापासून (Maharashtra Day) सुरु करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोग शाळा तपासणी, टेलीकन्सलटेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत.

Published on: Apr 29, 2023 10:36 AM
‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचं वर्चस्व; 12 जागांवर विजय
गौतमी कुणासमोर पण नाचेल, तुला का त्रास होतोय?, अजित पवार यांचं पुन्हा मश्किल भाष्य अन्…