Tanaji Sawant : आरोग्यमंत्री रुग्णालयांच्या कारभारावर असमाधानी, कामास त्रुटी आढळल्यास कारवाई अटळ
उस्मानाबाद रुग्णालयाविषयी तक्रारी ह्या आहेतच. त्यामुळे कधीही येऊन आढावा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे जो रुग्णालयांचा उद्देश आहे तो साध्य करा, रुग्णांची सेवा करा असा सल्लाही सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला तर मंगळवारी ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, वाशी, परांडासह उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते.
उस्मानाबाद : (Tanaji Sawant) आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सोलापूरनंतर आता उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी परंडा, भूम आणि वाशी येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन (Osmnanabad) उस्मानाबाद येथे आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती तर घेतलीच पण आता कामात अनियमितता आढळ्यास कारवाई अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शिवाय जिथे मनुष्यबळाचा आभाव आहे तिथे (Recruitment) पदभरती करुन घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.उस्मानाबाद रुग्णालयाविषयी तक्रारी ह्या आहेतच. त्यामुळे कधीही येऊन आढावा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे जो रुग्णालयांचा उद्देश आहे तो साध्य करा, रुग्णांची सेवा करा असा सल्लाही सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला तर मंगळवारी ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, वाशी, परांडासह उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते.