राज्यात उष्णतेची लाट मात्र महाबळेश्वरमध्ये थंडी

| Updated on: May 13, 2022 | 9:33 AM

राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे, मात्र दुसरीकडे सध्या महाबळेश्वरमध्ये थंडी पडल्याचे दिसून येत आहे. पर्यटक या थंडीचा आनंद घेत आहेत.

राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचे पहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे तापमान हे 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.  मात्र दुसरीकडे राज्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या गुलाबी थंडी पडल्याचे दिसून येत आहे. भल्या पहाटे उठून पर्यटक या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. सुटी असल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी गर्दी केली आहे.

Published on: May 13, 2022 09:33 AM
Akbaruddin Owaisi : ‘ज्याला जसं भुंकायचंय तसं भुंकू द्या’ औरंगाबादेतील अकबरुद्दीन औवेसी यांचं संपूर्ण भाषण UNCUT
युक्रेनमधून भारतात परतलेले 18 हजार विद्यार्थी संकटात, ऑनलाईन शिक्षण बंद