सावधान! काळजी घ्या..विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज
आजपासून विदर्भाला पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त
राज्यात मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. अशातच आता हवामान विभागाकडून मोठा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आजपासून पुढील काही दिवस विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच वर्धा जिल्ह्यात देखील सध्या 44.2 अंश अशी तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात काल 45.8 अंश सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
Published on: May 25, 2024 11:50 AM