अमरावतीत मुसळधार पाऊस, शिरजगावात ढगफुटी सदृश्य पाऊस, दुचाकी वाहून
दुसरीकडे अमरावतीच्या शिरजगाव कसबा गावात काही वेळातच नाले तुडूंब भरले. त्यामुळे रस्त्यावरून वेगात पाणी वाहू लागले होते. यात दुचाकी देखील पाण्यावर तरंगताना दिसल्यात.
अमरावती – सद्या विदर्भात मान्सून सक्रिय झाला आहे. खरीप हंगाम लागून असल्याने शेतकऱ्यांची शेती कामाची धावपळ सुरू आहे. त्यातचं अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची सुरूवात झाली. अमरावतीच्या बाजार समितीत असलेला शेतमाल पावसात भिजला आहे. खरिपात लागवडीसाठी विकायला आणलेला शेतमाल पावसात भिजल्याने शेतकऱ्यांनपुढे नवीन संकट उभं राहिलं आहे.
दुसरीकडे अमरावतीच्या शिरजगाव कसबा गावात काही वेळातच नाले तुडूंब भरले. त्यामुळे रस्त्यावरून वेगात पाणी वाहू लागले होते. यात दुचाकी देखील पाण्यावर तरंगताना दिसल्यात. नागरिकांची वाहन काढण्यासाठी प्रचंड तारांबळ उडाली होती. जास्त पाऊस झाला की या नाल्याना पूर येतो आणि रस्त्यावरून पाणी वाहू लागत. त्यामुळे घरांना देखील धोका निर्माण होतो. या परिस्थितीवर कायम तोडगा काढण्याची मागणी गावकऱ्यांनकडून होताना दिसते आहे.
Published on: Jun 19, 2022 10:16 AM