Bhandara Rain | भंडारा शहरात पावसाची तुफान बॅटिंग, पुन्हा झोडपले
Bhandara Rain | भंडारा शहरात पावसाने तुफान बॅटिंग केली. पावसाने शहरवासियांची दाणादाण उडवली.
Bhandara Rain | भंडारा शहरात (Bhandara) पावसाने (Heavy Rain) तुफान बॅटिंग केली. पावसाने शहरवासियांची दाणादाण उडवली. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट (Yello Alert) जाहीर केला आहे. नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून धरणातूनही विसर्ग सुरु आहे. काही ठिकाणी प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना ही केल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यंदा राज्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांसह जमीनही वाहून गेली आहे. सकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हजेरी लावली. काही पट्यात पावसाने एक तासापासून ठाण मांडले. पावसाच्या रिपरिपमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विद्युत पुरवठ्यावर तसेच पाणी योजनांवरही परिणाम दिसून आला आहे.