Nanded Rain | नांदेडमध्ये संततधार पावसाने रस्ते पाण्याखाली

| Updated on: Jul 13, 2022 | 11:03 AM

नांदेडमध्ये पैनगंगा, गोदावरी आणि आसना ह्या तिन्ही नद्या तुडुंब भरल्यामुळे नदीकाठच्या असंख्य गावांचा संपर्क तुटलाय. सलग पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेय.

नांदेडमध्ये आज सलग पाचव्या दिवशी देखील सूर्यदर्शन झाले नसून पावसाची संततधार सुरूच आहे, जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्रीपासून ढगफुटी सारखा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नांदेड शहरात चोहीकडे पाणी साचलेले आहे. तसेच अर्धापुर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेकडो हेक्टर जमिनिसह रस्ते पाण्याखाली गेलेयत. विष्णुपुरी बंधाऱ्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी सह सर्वच उपनद्या दुथडी भरून वाहतायत. नांदेडमध्ये पैनगंगा, गोदावरी आणि आसना ह्या तिन्ही नद्या तुडुंब भरल्यामुळे नदीकाठच्या असंख्य गावांचा संपर्क तुटलाय. सलग पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेय.

Published on: Jul 13, 2022 11:03 AM
Gurupourmima : गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री बाळासाहेब, आनंद दिघेंना अभिवादन करणार
Sanjay Raut : शिवसेनेकडून पुन्ह मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा, संजय राऊतांचा टोला