नाशिकच्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची पातळी वाढली

| Updated on: Jul 11, 2022 | 8:31 PM

नाशिक(Nashik) शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार(Heavy Rain) पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली असून, गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक(Nashik) शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त तसा प्रशासक रमेश पवार यांनी गोदाकाठच्या परिसरात येऊन पाहणी केली. तसेच इथल्या व्यावसायिकांना आपले दुकान इतरत्र हलवण्यासाठी निर्देश दिले आहेत. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सायंकाळपर्यंत पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे.

Published on: Jul 11, 2022 07:38 PM
कोल्हापुरच्या खोलखंडोबा मंदिरातील स्वयंभू शिवलिंग पाण्याखाली, पाहा व्हिडीओ
अंबरनाथमध्ये शिवसेनेला मोठा धक्का! 20 नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा