Maharashtra Rain Update : राज्यात पुढील 5 दिवस महत्त्वाचे, हवामान खात्याकडून मुंबईला अतिवृष्टीचा इशारा

| Updated on: Jun 08, 2024 | 10:13 AM

Maharashtra Rain Update : राज्यात येत्या पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाकडून कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Follow us on

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लोकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मात्र आता या उकाड्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून राज्यात पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. यंदा मान्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला असून तो आता भारताच्या इतर भागात पोहोचायला सुरुवात झाली आहे. मान्सून दाखल होण्याआधी काही भागात प्री मान्सून पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.