‘या’ जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा; जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये आज बंद

| Updated on: Jul 22, 2023 | 7:06 AM

राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ही जोरदगार पाऊस होत असून नद्यांना पूर आला आहे.

पालघर, 22 जुलै 2023 | पालघर जिल्ह्यासह राज्यात सध्या जोरदार पावसाची हजेरी लागलेली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये ही जोरदगार पाऊस होत असून नद्यांना पूर आला आहे. आता हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या 22/07/2023 रोजीपर्यंत पालघर जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याचा विचार करता, पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर ही सुट्टी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था या आज बंद असणार आहेत.

Published on: Jul 22, 2023 06:58 AM
“…तर पंतप्रधान मोदी यांना लाज वाटली पाहिजे”, मणिपूरच्या घटनेवरून काँग्रेस महिला नेत्याचं टीकास्त्र
“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!”, अमोल मिटकरी यांच्या ट्विटने चर्चांना उधाण!