मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला; पुढील 5 दिवस पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.गेले काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली.
मुंबई: मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.गेले काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. दादार, सायन, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाडसह मुंबईसह उपनगरात सर्व भागात जोरदार पाऊस पडत आहे. दादर, सायनमध्ये सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर सध्या अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आहे. पोलिसांनी अंधेरी सभेच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड करून बंद केला आहे. सध्या कोणत्याही वाहनाला आत प्रवेश दिला जात नाही.हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
Published on: Jul 14, 2023 11:38 AM