रत्नागिरीतील काजळी नदीला पूर, तोणदेतील साम मंदिरापर्यंत शिरले पुराचे पाणी

| Updated on: Jul 22, 2023 | 3:00 PM

रत्नागिरीत पावसाचा जोर कायम असल्याने काळजी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या नदीला पूर आल्याने तोणदे गावात नदीचं पाणी शिरलं आहे. तसेच नदी किनारी वसलेल्या शंकराच्या स्वयंभू श्री, साम मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे.

रत्नागिरी, 22 जुलै 2023 | रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.रत्नागिरी जिल्ह्याला 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह हे स्वत: पूरस्थितीवर लक्ष ठोवून आहेत. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने काळजी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या नदीला पूर आल्याने तोणदे गावात नदीचं पाणी शिरलं आहे. तसेच नदी किनारी वसलेल्या शंकराच्या स्वयंभू श्री, साम मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. नदीचे पाणी शेतामध्ये शिरले असल्याने शेती जलमय झाली आहे. होडीच्या माध्यमातून ग्रामस्थ मंदिरात ये-जा करत आहेत.

Published on: Jul 22, 2023 03:00 PM
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये थरार; प्रवासी बस पुरात अडकली, प्रवाशांना उतरवण्यासाठी आणला जेसीबी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, “हे अलिबाबा…”