म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय काय...
deputy cm ajit pawar
Image Credit source: TV9MARATHI

म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय काय…

| Updated on: Jul 08, 2024 | 2:48 PM

मुंबईत कोट्यवधि रुपये खर्च करुन दरवर्षी मे महिन्यात प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरलेल्या नाल्यांची साफ सफाई केली जात असते. परंतू तरीही पावसाच्या धारा अर्ध्या तास जरी सलग  बरसल्या तरी मुंबईची तुंबई दरवर्षी होत असते

काल रात्री मुंबईत अवघ्या 6 तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे, त्यामुळेच मुंबई तुंबली आहे. हा पाऊस वर्षभरात जितका पाऊस पडतो त्याच्या दहा टक्के पाऊस सहा तासांत कोसळला आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट केले आहे. याआधी मुंबईत गेली अनेक वर्षे शिवसेना आणि भाजपाची सत्ता होती. तरीही ज्यावेळी मुंबईत पाणी तुंबायचे तेव्हा राजकारणी लोक सत्ताधारी शिवसेनेवर टीका करायचे.  विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आता सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमावर ट्वीट केले आहे. आपल्या एक्स हॅंडलवर अजित पवार म्हणतात की काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या 10 टक्के आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही ( ग्लोबल वार्मिंग ) हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत असा मॅसेज अजित पवार यांनी पोस्ट केला आहे. या नागरिकांनी तीव्र शब्दात टिका केली आहे. विकास म्हणजे नुसते कॉंक्रीटीकरण नको, चार चाकी वाहनांचा खप वाढण्यासाठी नको तेथेही पुल आणि सागरी सेतू उभारले जात आहेत.कोस्टल रोड करण्यासाठी समुद्र बुजविला जात आहे.

Published on: Jul 08, 2024 02:48 PM
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
‘मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण…,’ काय म्हणाले होसाळीकर