कर्नाटकात मुसळधार पाऊस
कर्नाटकाच्या ओकालीपुरममध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, तब्बल तीन तास वाहतूक ठप्प होती.
कर्नाटकात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पवासामुळे कर्नाटकातील ओकालीपुरममध्ये जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळाले. पाणी साचल्यामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प होती. वाहतूक ठप्प असल्याने नागरिकांचे हाल झाले. मात्र दुसरीकडे या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.