पावसामुळे पुण्यातील खेड परिसराला पुराचा फटका

| Updated on: Sep 12, 2022 | 10:09 AM

पुण्यातील खेडमध्ये वेळ नदीला पूर आल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला असून पाणी ओसरण्याची नागरिक वाट बघत आहे. गेल्या काही तासांपासून पावसाचे प्रमाण वाढले असून पुण्यातील खेडसह अनेक भागात पाणीच पाणी होऊन शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत.

पुणे जिल्ह्यातील खेड परिसरात कालपासून संततधार पाऊस सुरू झाल्याने परिसरातील नदी नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे खेडसह इतर परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही रस्त्याच्या काठांना नदीच्या पाणी लागले आहे. त्यामुळे या खेड परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाारा देण्यात आला आहे. गेल्या काही तासांपासून पावसाचे प्रमाण वाढले असून पुण्यातील खेडसह अनेक भागात पाणीच पाणी होऊन शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. पुण्यातील खेडमध्ये वेळ नदीला पूर आल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला असून पाणी ओसरण्याची नागरिक वाट बघत आहे.

Published on: Sep 12, 2022 10:07 AM
आमचे सरकार आल्यावर कोकणचा विकास करू; नाना पटोले
लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात एनआयए ॲक्शन मोडमध्ये