मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा

| Updated on: Jul 08, 2024 | 1:38 PM

मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाल्याने मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी आपात्कालिक कक्षांचा ताबा घेतला आहे. महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगरानी महापालिकेच्या डिझास्टर कंट्रोलरुममध्ये सर्व परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत. एनडीआरएफ, महापालिकेची पथके, अग्निशमन दल, पोलीस आदी संस्थांना सर्तकतेचे आदेश दिले आहेत.

Follow us on

मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी मुंबईतील किती नालेसफाईचा दावा केला तरी पहिल्या पावसाच्या माऱ्यातच मुंबईची खरी नालेसफाई होते. कारण मुंबईकरांचा हा सर्व कचरा अरबी समुद्र आपल्या पोटात घेत असतो. या पावसाच्या जोरदार सरी बरसायला सुरुवात झाली की लोकल आधी बंद पडतात मग पक्के मुंबईकर समजून जातात की पावसाळा सुरु झाला.मुंबई ही सात बेटांपासून बनलेली आहे. त्यामुळे या शहरातील कॉंक्रीटीकरणा पावसाच्या पाण्याला मुरण्यासाठी जागाच नाही. त्यातच मुंबईतील काही भाग हा बशीप्रमाणे खोलगट आहे. त्यामुळे पावसाचे समुद्रातला भरती आली की हे ब्रिटीशकालीन पर्जन्य वाहिन्यांचे पाणी पुन्हा मागे फिरते.पावसाने मुंबई शहराची जीवन वाहीनी मानली जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. काल रात्रीपासून जोरदार पाऊस बरसल्याने मुंबई आणि उपनगरातील अनेक बैठ्या घरांमध्ये पाणी गेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपात्कालिन विभागाचा ताबा घेतला आहे. त्यात दुपारी 1.57 वा. समुद्राला भरती असल्याने 4.40 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्यांना सर्तकचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या टीमना कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.