नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस, अनेक रस्ते पाण्याखाली
नालासोपारा भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे या परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळत आहेत.
सध्या मुंबई आणि पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प आहे. नालासोपाऱ्यात देखील काहीसे असेच चित्र पहायला मिळत असून, नालासोपारा आणि विरारमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.