नांदेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी, काही भागात वीजपुरवठा खंडित
तसेच रात्रभर कोसळलेल्या या आषाढ सरीमुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालाय.
नांदेड परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात, राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. नांदेडमध्ये मध्यरात्री पासून जोरदार पाऊस बरसतोय, यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिलाच चांगला पाऊस आहे. या पावसामुळे नांदेड शहराच्या अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नांदेडकरांना रात्र अंधारातच काढावी लागलीय. सर्वदूर झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, पेरणी राहिलेले शेतकरी आता लगबग करताना दिसणार आहेत. तसेच रात्रभर कोसळलेल्या या आषाढ सरीमुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झालाय.
Published on: Jul 05, 2022 10:12 AM