सोलापुरात मुसळधार पाऊस
सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने सोलापूरकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
सोलापुरात काल सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सध्या राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. रविवारी कडाक्याच्या उन्हामुळे दिवसभर सोलापूरकर हैरान होते. मात्र सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
Published on: Jun 06, 2022 09:22 AM