जोरदार पावसामुळे गोसीखुर्द धरणाची पाणीपातळी वाढली
गोसीखुर्द धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने गोसीखुर्दचे 33 पैकी पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.
गोसीखुर्द धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने गोसीखुर्दचे 33 पैकी पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. हे दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून 695 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jul 07, 2022 09:29 AM