माऊलींच्या पालखीबरोबर पावसाचे आगमन; मंगळवेढेकरांसह बळीराजा सुखावला
जून महिना संपत आला तरी राज्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतील पाणी मिळत नव्हते. तर उखाड्यामुळे लोक हैराण झाले होते.
सोलापूर/ मंगळवेढा : सोलापूर शहर व परिसरात शुक्रवारी वातावरणात मोठा बदल झालेला पहायला मिळाला. जून महिना संपत आला तरी राज्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतील पाणी मिळत नव्हते. तर उखाड्यामुळे लोक हैराण झाले होते. मात्र काल सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि विविध भागात दमदार पावसाची सुरुवात झाली आहे. पावसाने झोडपून काढल्याने उखाड्यामुळे लोक हैराण झालेल्यांना दिलासा मिळालाच त्याचबरोबर पाऊस झाल्याने बळीराजाही सुखावला आहे. तर पाऊस झाल्याने संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जिल्ह्यात येताचं पावसाला सुरुवात झाल्याचं नागरीक बोलत आहेत.
Published on: Jun 24, 2023 07:59 AM