पुढील 36 तासांमध्ये समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता, हवामानशास्त्र विभागाकडून इशारा
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून इशारा. पुढील 36 तासांमध्ये समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता. नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. मुंबई पालिकेचे नागरिकांना आवाहन.
मुंबई, केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत पुढील 36 तासांमध्ये समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून इशारा. नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. मुंबई पालिकेचे नागरिकांना आवाहन. समुद्रात लाटा 0.5 मीटर ते 1.5 मीटर उंच उसळण्याची शक्यता आहे. यामुळे 4 मे पासून रात्री 2.30 वाजेपासून 5 मेपर्यंत रात्री 11.30 वाजेपर्यंत भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तब्बल 36 तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published on: May 04, 2024 03:36 PM