‘गद्दार ते गद्दारच शेवटी’, व्हायरल पोस्टवर शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया…
एकीकडे भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांची राज्यभरात युती आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीवरून पोस्टर वाद रंगल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या वतीन दिनकर पाटील देखील इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक : एकीकडे भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांची राज्यभरात युती आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीवरून पोस्टर वाद रंगल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या वतीन दिनकर पाटील देखील इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.त्यातच दिनकर पाटील यांच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून, त्यावर गद्दार आणि भ्रष्टाचारी असा उल्लेख करत अप्रत्यक्षरीत्या नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका करण्यात आलीय. हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”मी ते पोस्टर बघितलं नाही. पण मला असं वाटतं की, अनेकांना डोहाळे लागले आहे. त्यांना सगळ्यांना आपल्या शुभेच्छा आहे. युतीच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील.नाशिक लोकसभेत खासदार काय काम करतात, हे लोकांना माहीत आहे. प्रत्येकजण दावा करत असतो.ते काही अयोग्य आहे, असं मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया गोडसे यांनी दिली.