“राज ठाकरे कॉमेडी माणूस, लोकांची करमणूक करण्यासाठी ते बोलतात”, कोणी केली टीका?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीतील बंड या शरद पवार यांच्या सहमतीने झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. यावर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने त्यांना उपरोधात्मक टोला लगावला आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या सर्व गोष्टींची महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवात केली. शेवट त्यांच्यापर्यंतच आला. पण मला तसं वाटत नाही.मला प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ ही माणसं अजित पवार यांच्याबरोबर जाण्यासारखी वाटत नाहीत. त्यामुळे ही तीन माणसं संशयास्पद वाटतात. अजित पवारांबरोबर जावून मंत्रिपद स्वीकारतील असं वाटत नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे म्हणजे फक्त कॉमेडी आहे. जनतेची करमणूक करण्यासाठी ते बोलतात. त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही,” असं टकले म्हणाले.
Published on: Jul 05, 2023 03:06 PM