NEET Exam मध्ये मुलींना हिजाब खालून न दिल्याने पोलिसात तक्रार
ओळखपत्र तपासण्यासाठी आणि विद्यार्थी तपासणीसाठी नकाब काढवाच लागतो मात्र हा वाद वायफळ असल्याचे त्यांनी सांगितले.
वाशिममध्ये हिजाब प्रकरणावरुन वाशिम जिल्ह्यामध्ये पोलिसात तक्रार दाखल झाल्याची घटना घडली आहे. काल नीट परीक्षा होत असताना काही मुलींनी हिजाब आणि नकाब परिधान करुन आल्यामुळे परीक्षा केंद्रावर वादावादीचे प्रसंग घडले. यावेळी नीट परीक्षा समन्वय अरुण सरनाईक यांनी सांगितले की, परीक्षेचे जे नियमावली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेकर करण्यात आला आहे की, विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना साधा ड्रेस, भडक रंगाचे कपडे परिधार करुन येऊ नये. काल काही मुलींनी नकाब परिधान करुन आल्यानंतर त्यांची परीक्षा केंद्रावर तपासणी करण्यात आली मात्र तपासणीवरुन वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचेही नीट परीक्षेचे समन्वय अरुण सरनाईक यांनी सांगितले. कारण ओळखपत्र तपासण्यासाठी आणि विद्यार्थी तपासणीसाठी नकाब काढवाच लागतो मात्र हा वाद वायफळ असल्याचे त्यांनी सांगितले.
Published on: Jul 18, 2022 08:41 PM