Uday Samant | आठ महिन्यानंतर झाली उच्च समितीची बैठक, वेदांताप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडले जून्या सरकारवर खापर
Uday Samant | आठ महिन्यानंतर उच्च समितीची पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. त्यापूर्वी बैठकच घेण्यात आली नसल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
Uday Samant | आठ महिन्यानंतर उच्च समितीची पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बैठक घेतली. त्यापूर्वी बैठकच घेण्यात आली नसल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला पळविल्याबद्दल शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला. त्याला उद्योगमंत्री उदय सावंत (Uday Sawant) यांनी उत्तर दिले. गेल्या आठ महिन्यांपासून या समितीची बैठक झाली नव्हती. ती 15 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यावेळी कंपनीला त्यांनी विशेष सवलत दिल्याचे सांगितले. 38,138 कोटींचे पॅकेजही देण्यात आलं. पण त्यापेक्षा गुजरात राज्याने कंपनीला जास्त सवलती दिल्याचे सांगत कंपनीने गुजरातकडे मोर्चा वळविला.
जर मागील आठ महिन्यात या उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. त्यांनी लवकर सोयी-सुविधांसह सवलती दिल्या असता तर वेदांता कंपनी गुजरात गेली नसती असा पलटवार उदय सामंत यांनी केला. सत्तेत असताना काहीच न केलेले आता विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.