मोठी बातमी! कोविड घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाचे आर्थिक गुन्हे शाखेला थेट निर्देश, पेडणेकर यांना दिलासा
कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा ठपका त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर याचप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
मुंबई, 12 ऑगस्ट 2023 | मुंबईच्या माजी महापौर तथा ठाकरे गटाच्या महिला नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा ठपका त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर याचप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पण आता याबाबत मोठी अपडेट समोर येत असून मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत महत्वाचा निर्णय देताना पेडणेकर यांना दिसाला दिला आहे. याबाबत न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला पेडणेकर यांच्यावर २८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कारवाई करू नये निर्देश दिले आहेत. त्यामुळे पेडणेकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
Published on: Aug 12, 2023 10:13 AM