भर सभेत शरद पवारांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, केवळ सत्तेसाठी…
देशाचे अर्थकारण ज्या कामगार आणि शेतकऱ्यांवर अवलंबून आहे त्यांच्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. वाढती महागाई, मुंबईतील मराठी कामगारांच्या कुटुंबांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे
नाशिक रोड (नाशिक) : हिंद मजदूर सभेचा अमृतमहोत्सव हा देशभरात साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते नाशिकरोड येथे पार पडला. यावेळी आपल्या भाषणात पवार यांनी आजच्या राजकारणावर खंत व्यक्त केली. तर सत्तेचा वापर हा महागाई, नोकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी करा असा सल्लाही त्यांनी राजकर्त्यांना दिला आहे.
देशाचे अर्थकारण ज्या कामगार आणि शेतकऱ्यांवर अवलंबून आहे त्यांच्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. वाढती महागाई, मुंबईतील मराठी कामगारांच्या कुटुंबांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. मात्र, सत्तेसाठी केवळ राम आणि अयोध्या या मुद्द्यांकडे लक्ष देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सध्याचे सरकार करत असल्याचा घणाघात पवार यांनी केला आहे.
Published on: Apr 09, 2023 07:41 AM