वाहन धारकांनो समृद्धी महामार्गावर जाताय!; आधी वाहन तपासा, अन्यथा ‘या’ कारणामुळे ‘नो एन्ट्री’
वाहन धारकांनो समृद्धी महामार्गावर जाताय तर तुमच्या गाडीचे टायर ओके आहेत का हे आधी तपासा. अन्यथा फक्त टायरच्या कारणामुळे तुम्हाला समृद्धी महामार्गावर जाता येणार नाही
नागपूर : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे येथे आरटीओची तपासणी वाढली आहे. तर महामार्गावर वेगाने वाहन चालवल्यास टायर फूटू शकतो असे काही तज्ज्ञाचे मत होते. त्याप्रमाणे आरटीओ विभागाणे आपला मोर्चा वाहनांकडे वळवत तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत तर वाहन फिट बसत नसेल तर तुम्हाला समृद्धी महामार्गावर जाता येणार नाही. त्यामुळे वाहन धारकांनो समृद्धी महामार्गावर जाताय तर तुमच्या गाडीचे टायर ओके आहेत का हे आधी तपासा. अन्यथा फक्त टायरच्या कारणामुळे तुम्हाला समृद्धी
महामार्गावर जाता येणार नाही. समृद्धी महामार्गावरील अनेक अपघातांचे मुख्य कारण म्हणजे टायर फुटणे किंवा टायरशी संबंधित समस्या आहेत. तर आपघात रोखण्यासाठी आरटीओची तपासणी सुरू झाली आहे. मुंबई ते नागपूर असा हा मार्ग असून सध्या शिर्डीपासून नागपूरपर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.