Raj Thackeray : हिंदूंचा हिंदुस्थान, मनसे नवा अजेंडा, काय आहे उद्देश..!
एकीकडे सदस्य नोंदणीला सुरवात करण्यात आली आहे तर दुसरीकडे हिंदूचा हिंदूस्थान हे मनसे बॅनर हा चर्चेचा विषय ठरले आहे. शिवाय या बॅनरवर हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी हिंदूजननायक असे म्हणत राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. मध्यंतरी भोंग्याचा मुद्दा घेतल्यानंतर आता भारत नाही तर हिंदूस्थान म्हणत राज ठाकरे हिंदूत्व याच मुद्द्याला महत्व देत असल्याचे अधिरोखित करण्यात आले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून (Raj Thackeray) राज ठाकरे हे प्रखर हिंदूत्वाची भूमिका घेत आहेत. सध्याच्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेण्यासाठी (MNS Party) मनसे सर्वकश प्रयत्न करीत आहे. एकीकडे सदस्य नोंदणीला सुरवात करण्यात आली आहे तर दुसरीकडे हिंदूचा हिंदूस्थान हे मनसे बॅनर हा चर्चेचा विषय ठरले आहे. शिवाय या बॅनरवर हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी हिंदूजननायक असे म्हणत राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. मध्यंतरी भोंग्याचा मुद्दा घेतल्यानंतर आता भारत नाही तर हिंदूस्थान म्हणत राज ठाकरे हिंदूत्व याच मुद्द्याला महत्व देत असल्याचे अधिरोखित करण्यात आले आहे. तर हिंदूत्व हाच मुद्दा मनसेचा राहिलेला आहे. आता तो मुद्दा नव्याने मांडत असल्याचे (Ajay Shinde) मनसेचे अजय शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मनसे वेगळ्या विचारात पुन्हा मतदारांसमोर जाणार आहेत. त्यामुळे मतदार हे कसे घेतात हे पहावे लागणार आहे.