Nupur Sharma | हिंदुत्वावाद्यांचा नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ मोर्चा, औरंगाबादेत संघटना रस्त्यावर
Nupur Sharma | हिंदुत्ववादी संघटनांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ औरंगाबादेत मोर्चा काढला आहे.
Nupur Sharma | भाजपच्या माजी नेत्या आणि प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरोधात देशभरात रान पेटले होते. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरात हिंसाचार ही झाला. तर राजस्थान आणि महाराष्ट्रात दोघांचा खून (Murder) करण्यात आला होता. आता नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ औरंगाबादेत मोर्चा (Hindutvavadi March) काढण्यात आला आहे. पैठण गेट येथून मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे (Collector Office) कूच केली. या मोर्चामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी औरंगपुऱ्यात छोट्या सभेचे आयोजन ही करण्यात आले होते. हिंदुवर देशात मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु असून त्यांच्या हत्या होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि नुपूर शर्मा यांना समर्थन देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे म्हणणे मोर्च्यात सहभागी आंदोलकांनी सांगितले. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर मुस्लीम (Muslim) समाज आक्रमक झाला होता. काही मौलवींनी फतवे ही काढले होते.