Special Report | भुजबळ यांच्या दोन वक्तव्यांमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; भुजबळांनी नेमकं म्हटलं?

| Updated on: Aug 21, 2023 | 9:03 AM

अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे ओळखले जातात. त्यामुळेच ते कधी कधी अडचणीत सापडतात. आता देखील त्यांचे वक्तव्य वादाचे कारण ठरलं आहे. ज्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड अजित पवार यांनी केलं आणि शरद पवार यांचे अनेक जवळचे नेते भाजपच्या वळचळीला गेले. यात राष्ट्रवादी अजित पवार गाटत गेलेले छगन भुजबळ हे देखील आहेत. यावेळी भुजबळ यांच्या एका वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तर यामुळे हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. भुजबळ यांनी, कुठल्याही ब्राम्हण घरामध्ये शिवाजी, संभाजी हे नाव ठेवत नाही. आम्हाला सरस्वती, शारदा यांनी शिक्षण दिलं नाही असे दोन वादग्रस्त वक्तव्य केली होती. ज्यामुळे सध्या जोरदार वाद रंगला आहे. त्याविरोधात परशुराम सेवा संघ आणि ब्राम्हण महासंघानं आक्षेप घेतलाय. भुजबळांच्या याच दोन्ही वक्तव्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी काय आक्षेप घेतलाय? त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 21, 2023 09:03 AM
tv9 Special report | …कांदा शेतकऱ्याला हात देत असतानाच…; निर्यात बंदीने केला वांदा;
Special report | संस्थांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र? राऊत यांचा रोखठोक मधून नवा दावा