हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आज निकाल, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

| Updated on: Feb 09, 2022 | 11:07 AM

दोन वर्षे पूर्वी दोन फेब्रुवारी 2020 अंकिता पिसुड्डेला (Ankita Pisuddela)  हिंगणघाट ( Hinganghat) येथील नंदोरी चौक परिसरात पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं.

दोन वर्षे पूर्वी दोन फेब्रुवारी 2020 अंकिता पिसुड्डेला (Ankita Pisuddela)  हिंगणघाट ( Hinganghat)
येथील नंदोरी चौक परिसरात पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. १० फेब्रुवारीला (10 February )उपचारादरम्यान नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात अंकीता पिसूड्डेचा मृत्यू झाला. अंकिता जळीतकांड प्रकरणात पोलिसांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार आरोपी निश्‍चित केले. या जळीत कांडाचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले होते. पीडित अंकिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी आहेत. शासनाला लोक आग्रहापुढे झुकून सदर प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयामध्ये होईल असे घोषित केले. विशेष सरकारी वकील म्हणून शासनातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती याप्रकरणी करण्यात आली. त्यामुळे प्रकरणाची जलद चौकशी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम, अॅड. दीपक वैद्य यांनी भाग घेतला. बचाव पक्षातर्फे अॅड. भूपेंद्र सोने, शुभांगी कोसार, अवंती सोने व सुदीप मेश्राम यांनी सहकार्य केले. आज या प्रकरणाचा निकाल असून. आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे ला आज शिक्षा सुनावली जाणार आहे.
Published on: Feb 09, 2022 11:07 AM
भिवंडीत भंगार गोदामांना भीषण आग, 17 गोदामं जळून खाक
माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी दिली – संजय राऊत