2024 ला नरेंद्र मोदी तर 2029 ला ‘ही’ व्यक्ती पंतप्रधान होणार; संतोष बांगर यांचा दावा

| Updated on: Apr 13, 2023 | 2:53 PM

Santosh Bangar On Yogi Adityanath : 2029 ची निवडणूक आणि पंतप्रधानपदाबाबत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वक्तव्य केलंय. ते काय म्हणालेत? पाहा...

हिंगोली : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना देशाच्या पंतप्रधानपदाबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय. 2024 आणि 2029 निवडणुकीवरही संतोष बांगर यांनी भाष्य केलंय. “2024 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. तर 2029 ला योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान होतील. असा मला विश्वास आहे. लोकांना योगी आदित्यनाथ यांच्या कामावर विश्वास आहे. लोक त्यांना मानतात त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान होतील, असं बांगर म्हणाले आहेत. अयोध्या दौऱ्यानंतर संतोष बांगर यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे जे बोलतात, त्यात काहीही तथ्य नाही, असं संतोष बांगर म्हणालेत.

Published on: Apr 13, 2023 02:53 PM
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर केसरकरांचा टोला; म्हणाले, लावा ठाकरेंची ती कँसेट
4 Minutes 24 Headlines | आदित्य ठाकरे बालिश; त्या वक्तव्यावरून शिंदेंची प्रतिक्रिया