Pune Crime : हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात; पगाराचे पैसे दिले नाही म्हणून जाळली ट्रॅव्हल बस..

| Updated on: Mar 20, 2025 | 10:54 PM

Pune Tempo Travel Fire Updates : पुण्यात काल टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यात एका ग्राफीक कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र आता हा अपघात नसून घातपात असल्याचं उघड झालं आहे.

पुण्याच्या हींजवडी भागात बुधवारी सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हलला आग लागल्याची घटना घडली होती. यात एका ग्राफीक कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र प्रथमदर्शनी अपघात वाटणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासातून उघड झाला आहे. या प्रकरणी टेम्पोचा चालक जनार्दन नीळकंठ हंबरडीकर हा आरोपी आहे. मालकाने दिवाळीला बोनस दिला नाही, पगार कापला या वादातून जनार्दन याने हे भयानक कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

संबंधित ग्राफीक कंपनीच्या मालकाचे टेम्पो चालकाशी जुने वाद आहेत. घटनेच्या एक दिवस आधी आरोपी जनार्दन याने फ्लेमेबल रसायन खरेदी केल. घटनेच्या दिवसशी सकाळी जनार्दनने फ्लेमेबल रसायन असलेली बाटली आणि कापडाच्या चिंध्या ठेवल्या. त्यानंतर त्याने हींजवडी भागात येताच ही बाटली गाडीत सांडवली आणि त्यानंतर आगपेटीने काडी लावली. यामुळे लागलेल्या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला.

Published on: Mar 20, 2025 10:53 PM
नागपूर हिंसाचाराच्या आधी नेमकं काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
Aaditya Thackeray VIideo : दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री आक्रमक पण महायुतीचे ‘हे’ 3 आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूनं?