‘शिवप्रेमींची फसवणूक थांबवावी, खरी वाघनखं येथे आहेत, ती वाघनखं महाराजांची…,’ काय म्हणाले इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत
एकतर 'विक्टोरिया अँड अल्बर्ट' म्युझियमवाले तरी खोटं बोलत आहेत, कारण त्यांना पैसे मिळणार आहे किंवा सरकारचे मंत्री तरी खोटं बोलत आहेत असा आरोप इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केला आहे.
राज्य सरकार लंडनच्या म्युझियममधून शिवरायांची वाघनखं परत आणणार आहे. राज्य सरकारने लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम बरोबर कोट्यवधी रुपयांचा करार करणार आहे. हा इतका पैसा खर्च करून लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणली जाणार आहेत. ती वाघनखं अफझल खान याच्याबरोबर महाबळेश्वरला प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या गनिमी हल्ल्यात शिवरायांनी वापरल्याचा दावा सरकार करीत आहे. मात्र हा दावा इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी खोडून काढला मात्र ही वाघनखं शिवरायांची असल्याचा कोणताही पुरावा लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलेला नाही. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने दिलेले पत्रच दाखवित हा दावा केला आहे.वाघनखे 1971 साली म्युझिअमला भेट दिल्याचे पत्रात म्हटले आहे. भारतातील विविध ठिकाणांकडून एकूण 6 वाघनखं आली आहेत. ही वाघनखे ग्रँट डफ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून भेट मिळाली होती. वाघनखे 1818 सालच्या दरम्यान त्यांच्याकड प्रतापसिंह महाराज यांनी दिल्याचे म्हटले आहे.परंतू खरी वाघनखं आणि भवानी तलवार सातारा येथील गादीकडेच सुरक्षित आहेत असेही सावंत यांनी म्हटले आहे.